डी.जे.मुक्त माजलगांव या संकल्पनेची माजलगांव शहर पोलीसांकडुन सुरुवात
माजलगाव शहर पोलीस स्टेशन ॲक्शन मोडमध्ये
माजलगाव/प्रतिनिधी/ सण उत्सवामध्ये, महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीमध्ये तसेच लग्न समारंभामध्ये, डीजे लावुन ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण खुप वाढलेले आहे. मानवी आरोग्यास ते धोकादायक असल्याने मा.न्यायालयाने डीजेवर बंदी आणत आवाजावर नियम घालुन दिलेले आहेत. तसेच नागरीकांकडुन सुध्दा डीजे च्या पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.
त्यामुळे यापुढे येणारे सर्व सण, उत्सव व जयंती हे डीजे मुक्त करण्याचा माजलगांव शहर पोलीसांनी संकल्प केला असुन आगामी सण, उत्सवामध्ये किंवा महापुरुषांच्या जयंतीमध्ये नागरीकांनी डीजे न लावता पारंपारीक वाद्याचा वापर करण्याचे आवाहन पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.
तसचे वाहनामध्ये फेरबदल करुन डी.जे. बसवुन वापरणाऱ्या दोन वाहनाविरुध्द पोलीसांकडुन कारवाई करण्यात आली असुन कोणीही वाहनामध्ये मोडीफाय करुन डी.जे.बसवुन वापरतांना दिसुन आल्यास डायल ११२ क्रमांकावर कॉल करुन पोलीसांना माहीती देण्याचे आवाहन पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.