Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न करणाऱ्या तलाठीवर कारवाई करा -...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न करणाऱ्या तलाठीवर कारवाई करा – रिपब्लिकन सेनेची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न करणाऱ्या तलाठीवर कारवाई करा – रिपब्लिकन सेनेची मागणी

आत्ताच एक्सप्रेस

गंगापूर/ प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील टाकळी ( कदीम )  येथील तलाठी श्रीमती कापडणीस  यांनी जाणीवपूर्वक व द्वेश भावनेतून राज्य व केंद्र शासनाचे आदेश असतानाही महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही . तसेच रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता  आपण जयंती का साजरी केली नाही तर त्यांनी उद्धटपणे कार्यकर्त्यास उत्तरे दिली व आम्ही केली नाही तुम्हाला काय करायचे करून घ्या अशी उर्मड भाषा वापरली . तसेच या जातीवादी तलाठ्याविरुद्ध मा विभागीय आयुक्त  जिल्हाधिकारी  छत्रपती संभाजी नगर, तसेच तहसीलदार  तहसील कार्यालय गंगापूर यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने तक्रार निवेदन देऊनही आतापर्यंत कुठलीच कार्यवाही झाली नाही ,तरी  या शेवटच्या निवेदनाद्वारे इशारा देण्यात येतो की येत्या आठ दिवसात संबंधितावर जाती द्वेश भावनेतून जयंती साजरी न करणे, देशद्रोह व ॲट्रॉसिटी ॲक्ट व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे नसता रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय , छत्रपती संभाजीनगर, येथे निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी,यांना निवेदनातुन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

असा इशारा  बबन साठे जिल्हा महासचिव रिपब्लिकन सेना.मिलिंद बनसोडे मराठवाडा अध्यक्ष यांनी दिला . या निवेदनावर अजय बनसोडे शहराध्यक्ष , सुनील पांडे शहर उपप्रमुख , योगेश दाणे जिल्हा संघटक , कुंदन मोरे तालुका सचिव पश्चिम , शेषराव दाणे जेष्ठ नेते आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत .
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments