Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादनांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली चे आयोजन

नांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली चे आयोजन

नांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली चे आयोजन

 

नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत हर घर तिरंगा अभियान 2025  च्या निमित्ताने दिनांक 12 ऑगस्ट 2025   रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नांदेड येथे तिरंगा बाईक व सायकल रॅली तसेच तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून देशभक्तीचा संदेश दिला.

या रॅलीचे उद्घाटन श्री. प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या प्रसंगी श्री. राजेंद्र कुमार मीणा, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड व श्री. सेल्वा कुमार, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी, नांदेड, तसेच केंद्रीय विद्यालय नांदेड चे प्राचार्य श्री अशोक कुमार विश्वकर्मा उपस्थित होते.  रॅली मध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या जवानांनी, स्काऊट्स आणि गाईड यांनी, केंद्रीय विद्यालय/नांदेड च्या विद्यार्थ्यांनी तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला.

अधिकारीवर्गाने कर्मचाऱ्यांना आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकावण्याचे आवाहन केले.

या रॅलीद्वारे देशभक्तीची भावना, समाजातील सहभाग व तिरंग्याचा सन्मान करण्याचा संदेश सर्वत्र पोहोचविण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments