Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार कॉ.उज्वला पडलवार यांना...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार कॉ.उज्वला पडलवार यांना मिळणे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती : कॉ. गंगाधर गायकवाड 

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार कॉ.उज्वला पडलवार यांना मिळणे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती : कॉ. गंगाधर गायकवाड 
नांदेड : बीडमध्ये दि.३ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने निवडक दहा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्या मध्ये नांदेड येथील कामगार चळवळीतील लढाऊ साथी कॉ. उज्वला पडलवार यांचा समावेश आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केजमध्ये सुरू असलेला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाचा पुरस्कार सोहळा बीडमध्ये घेऊन आले ही कौतुकाची बाब आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य चंद्र-सूर्य असेपर्यंत जनमानसात जिवंत राहील.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी (दि.३) शेतकरी कामगार पक्ष व क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण आणि क्रांतिसिंह नाना पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.बजरंग सोनवणे हे  होते.
शेकापक्षाचे ध्वजारोहण राज्य चिटणीस मंडळ सदस्या चित्राताई गोळेगावकर व प्रा. उमाकांत राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नेत्या सुशिला मोराळे, माजी आमदार उषा दराडे, शेकापचे जिल्हा चिटणीस भाई विष्णूपंत घोलप, राजकुमार घायाळ (हमाल मापाडी महामंडळ), अ‍ॅड.अजय बुरांडे (माकप), इकबाल पेंटर, चंद्रकांत चव्हाण (शिक्षक आघाडी), भाऊराव प्रभाळे (भाकप), राजेश घोडे (आझाद क्रांती सेना), रोहिदास जाधव (एसएफआय), प्रा. पंडित तुपे (युक्रांद), गणेश मस्के (संभाजी ब्रिगेड), ॲड. राहुल वायकर (विभागीय संभाजी ब्रिगेड), नितीन सोनवणे (पँथर सेना), सुभाष लोणके (डीपीआय), ॲड.शिवाजी कांबळे (समाजवादी पक्ष), अशोक येडे (आप) आदी मान्यवर उपस्थित होते.
कॉ.उज्वला पडलवार यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांनी अनेक यशस्वी आंदोलने करून कामगार कष्टकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.
कॉ.पडलवार ह्या सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) राज्य सचिव असून नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतात.
त्यांच्या कार्याची दखल शेतकरी कामगार पक्षाने घेतली असून त्यांना कामगार क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले म्हणजे त्यांच्या कामाची ही पावती आहे असे सीटू जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड मनोगत व्यक्त केले आहे.
कॉ.उज्वला पडलवार यांचा जन्मदिवस ४ ऑगस्ट रोजी आहे आणि आदल्या दिवशी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून त्यांना सदिच्छा देण्यात येत आहेत.
Previous article
Next article
कुक्कडगांव ग्रामपंचायत कार्यालय बनलं ‘फक्त शोभेची वस्तू’! – खरा कारभार खाजगी खोलीतून कुक्कडगांव (ता. अंबड, जि. जालना): ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे गावच्या विकासाचे केंद्रस्थान… पण कुक्कडगांवमधील ग्रामपंचायत कार्यालय फक्त जयंत्या साजऱ्या करण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. वास्तव असा आहे की कारभार मात्र अंबडमधील एका खाजगी खोलीतून चालवला जातो – हे उघड झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावात आहे कार्यालय – पण कामे खाजगी खोलीत! कुक्कडगांव ग्रामपंचायतीचे अधिकृत कार्यालय गावात असले तरी, त्यामध्ये कोणतेही शासकीय व्यवहार होत नाहीत.तसेच ग्रामपंचायत चे सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नसल्याचे निदर्शनास आले आहे,रोजच्या कामकाजासाठी सचिव, सरपंच, कर्मचाऱ्यांना अंबडमधील एका खाजगी कार्यालयाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कामांना खोळंबा येतो आहे. महापुरुषांच्या जयंत्या आणि खर्च मात्र भरघोस! ग्रामपंचायत कार्यालयात फक्त महापुरुषांच्या जयंत्या, हार-फुले आणि फोटो लावण्यापुरते कार्यक्रमच होतात. त्यासाठी शासकीय निधी खर्च केला जातो. मात्र खऱ्या अर्थाने लोकसेवेचे कोणतेही काम या इमारतीत होत नाही. शासनाच्या निधीचा चुकीचा वापर? या कार्यालयाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी व इतर खर्चासाठी दरवर्षी लाखो रुपये शासकीय निधी दिला जातो. मात्र, या निधीचा प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या सोयीसाठी वापर होताना दिसत नाही. हा प्रकार म्हणजे शासकीय निधीचा अपवापरच मानला जातो, अशी जोरदार टीका ग्रामस्थ करत आहेत. ग्रामस्थांची मागणी – ग्रामपंचायत कार्यालयात नियमितपणे शासकीय कामकाज व्हावे अंबडमधील खाजगी जागेतील अनधिकृत व्यवहार थांबवावेत निधीचा योग्य वापर करावा व चौकशी करण्यात यावी ग्रामपंचायत कार्यालयाला खऱ्या अर्थाने कार्यरत केंद्र बनवावे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments