Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी. आमदार सतीश चव्हाण, यांची नियुक्ती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी. आमदार सतीश चव्हाण, यांची नियुक्ती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी. आमदार सतीश चव्हाण, यांची नियुक्ती

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी  (दि.17) मुंबईत आमदार सतीश चव्हाण यांना नियुक्त पत्र दिले. याप्रसंगी आ.शिवाजीराव गर्जे, आ.प्रताप पाटील चिखलीकर, मा.आ.कैलास पाटील, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा, मिनल खतगावकर आदींची उपस्थिती होती.
आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा २६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एकंदरीत २६ वर्षांच्या वाटचालीत निष्ठावान कार्यकर्ते आणि कर्तबगार नेत्यांच्या जोरावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांशी देखील आपली नाळ जोडली आहे. खरे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षात कधीच जात, पात, धर्म, राजकीय पार्श्वभूमी असे काहीही न पाहता पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्याला संधी दिली जाते. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास एकदा नव्हे तर तीन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा आमदार आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष होण्याची संधी मिळाली असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांचे आमदार सतीश चव्हाण यांनी मनापासून आभार मानले.
 छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या विचारांशी जोडलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील सामान्य नागरिकांपर्यंत पक्षाचा विचार पोहचून जिल्ह्यातील पक्ष संघटन प्रभावी व लोकहिताचे काम करण्यावर आपला भर राहील. गावपातळी ते तालुका अशी पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येईल. पक्षाचे सर्व सेल कार्यान्वित करून युवक, महिला व मुख्य जिल्हा कमिटीची नव्याने रचना करण्यात येईल. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी एक नंबरचा पक्ष व्हावा यादृष्टीने पक्षविस्तारासाठी लक्ष देणार असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. तसेच स्थानिक पातळीवरील युवा नेतृत्वाला पक्षामध्ये काम करण्याची अधिकाधिक संधी दिली जाईल. महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्याबरोबरच अर्थकारणामध्ये तिचे हात बळकट केले जातील. शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांना शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची ताकद निश्चितच वाढलेली दिसेल असा विश्वास आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments