काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी उपस्थीत रहावे – देशमुख
जालना/प्रतिनीधी/आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व जालना जिल्ह्यातील विधानसभा निहाय दि १६ एप्रिल रोजी होणाऱ्या संघटनात्मक आढावा बैठकीस काँग्रेसचे आजी – माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार दि १६ एप्रिल रोजी जालना जिल्हातील भोकरदन, बदनापूर, घनसावंगी,जालना व परतुर विधानसभेतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक तयारी व पक्ष संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन पक्षाचे निरीक्षक माजी आ.राजेश एडके यांच्या अध्यक्षतेखालील व खा.डाॅ कल्याणराव काळे, जिल्हा प्रभारी मा.आ.नामदेवराव पवार, सहप्रभारी ॲड अनिल मुंडे,सेवादल प्रदेशाध्यक्ष विलास औताडे,आ. राजेश राठोड,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा मा.आ. कैलास गोरंट्याल, प्रदेश सरचिटणीस ॲड राम कुराडे,ओबीसी राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र राख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि १६ एप्रिल बुधवार रोजी सकाळी १० वा. भोकरदन- जाफराबाद विधानसभेची बैठक काँग्रेस कार्यालय, सिल्लोड रोड, भोकरदन येथे व सकाळी ११:३०वा. बदणापुर – अंबड विधानसभेतील बैठक ,पाथ्रीकर कॅम्प, बदनापूर येथे आणि दुपारी १ वा.जालना विधानसभेची बैठक हाॅटेल अंबर जालना येथे तर दुपारी ४ वा परतुर-मंठा व घनसावंगी विधानसभेतील बैठक छ.शिवाजी महाराज, चौक,मंठा येथे आयोजित करण्यात आली असून या विधानसभानिहाय संघटनात्मक आढावा बैठकीस जालना जिल्हातील काँग्रेसच्या सर्व आजी माजी प्रंटल, सेल, विभागाचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व माजी पदाधिकारी,सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजाभाऊ देशमुख व शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद यांनी केले आहे.
