चोरांच्या बंदोबस्तासाठी व्यापाऱ्यांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर
ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर वाढला
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ प्रतिनिधी/विजय पगारे / येथील शासकीय कार्यालये, दुकाने, मोबाइल शॉप, जनरल स्टोअर्स, कापड दुकाने, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे पहायला मिळते आहे .
यामुळे अनुचित प्रकार घडवून आणणाऱ्यांना, तसेच चोरी – चपाटी करणारे आरोपींना पकडण्यात पोलिसांना मदत मिळत आहे. व्यापाऱ्यांनी सुरक्षेसाठी कॅमेरे बसवावेत असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या किमती आवाक्यात;
ज्या दुकानांतून कॅमेरे खरेदी केले जातात तेथूनच संपूर्ण प्रणाली बसवण्यात येते. दुकानांचा विचार करता सिस्टीमच्या दर्जानुसार त्यांच्या किमती ठरवण्यात आलेल्या आहेत. ३० हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत.
दुकानातील स्थितीची माहिती;
दिवाळी – दसरा, लग्नसराई यांसारख्या मोठ्या सणांच्या दिवशी दुकानांत ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. अशा गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे चोरी करत असल्याने व्यापाऱ्यांना ग्राहकांची काळजी घेत चोरट्यांवरदेखील लक्ष ठेवावे लागते. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा असेल तर व्यापाऱ्यांचा त्रास कमी होतो. दुकानाच्या कामकाजाचे संपूर्ण चित्रीकरण होत असल्याने चोरट्यांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होत आहे.
व्यापाऱ्यांचा कल वाढला;
सोयगाव परिसरात धाडसी चोऱ्या, दरोडे अशा घटनांत वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात व्यापाऱ्यांकडून दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांना फायदा;
सीसीटीव्ही कॅमेरे लावलेल्या छोट्या-मोठ्या दुकानांत चोरट्यांवर लक्ष ठेवणे म्हणजे वचक ठेवणे सहज शक्य होत असल्याने त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे.
-राजेंद्र काळे सोयगाव
जिल्हा, तालुकासह ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी व्यापाऱ्यांत वाढलेली आहे. आणि ती गरजेची आहे. अनुचित प्रकार घडला, अथवा चोरी झाली, दरोडा पडला तर तपास करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची भूमिका मोलाची ठरते. बस आगारात समोर आणि सोयगाव शहरातील बस स्टँड समोर पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरॉ लावण्यासाठी खांब उभाण्यांत आला असला तरी, कॅमेरे अभावी शोभेची वस्तू ठरला आहे. येथेही त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे सुरू व्हावेत.
-दिलिप मचे
सामाजिक कार्यकर्ते