बिडकीन / प्रतिनिधी /मुस्लिम समाजातील सगळ्यात मोठा सण म्हणजे ईद उल फित्र,महिन्या भराचे रोजे म्हणजेच उपवास ठेऊन अल्लाहची इबादत करण्यात येते.महिन्याभरा नंतर झालेल्या चंद्र दर्शनाने रमजान महिन्यातील उपवासाची सांगता सामूहिक नमाज पठण करून केली जाते.याच अनुषंगाने चितेगाव
परिसरातील ईदगाह असलेल्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सकाळी 9:30 वाजे दरम्यान पारंपारिक पद्धतीने सामूहिक नमाज पठण करून गळाभेट घेत ईद साजरी केली.या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ विनायकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह तसेच बिडकीन पोलीस ठाण्याचे एपीआय निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय महेश घुगे यांनी चितेगांव ईदगाह मैदान परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या वेळी मौलाना, व चितेगाव माझी सरपंच वाहेद शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्व धर्म समभाव व शांतीचा संदेश दिला. या वेळी पी एस आय महेश घुगे यांनी शांती, समृद्धी, सदभावनेचा संदेश देत र्व मुस्लिम बांधवाना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.