*शहरात वारा आणि पावसामुळे 11 ठिकाणी झाड पडले*
मनपा, दि 12 जून:
आज संध्याकाळी वारा आणि पावसामुळे शहरातील विविध 11 ठिकाणी झाड पडल्याचे कॉल अग्निशमन केंद्रास प्राप्त झाले.
याचात जुबली पार्क, उत्सव मंगल कार्यालय च्या मागे, पवन नगर, आंबेडकर चौक, चिश्त्या कॉलोनी, उल्कानगरी, चाणक्यपुरी दर्गा चौक, बन्सीलालनगर, नंदनवन कॉलोनी, देवगिरी कॉलोनी आणि पदमपुरा या ठिकाणी प्रत्येकी एक झाड पडल्याची माहिती मिळाली असून सर्व ठिकाणी अग्निशमन दल रवाना झाले असून झाडे रस्त्यातून हटवण्याचा काम सुरू आहे.
याशिवाय, रोपळेकर हॉस्पिटल जवळ अंदरग्राऊंड मध्ये पाणी साचल्याने पंपिंग करून काढण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन आणि आपत्ती व्यस्थापन विभागातर्फे देण्यात आली आहे.
**पावसाळ्यात आपात्कालीन मॉन्सून कंट्रोल रूम*
*हेल्पलाईन नंबर जारी*
पावसाळ्यात आपात्कालीन स्थितीत नागरिकांची मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे मॉन्सून कंट्रोल रूम सुरू करण्यात आला आहे.
आपात्कालीन स्थितीत नागरिक *0240-2617165 आणि 0240-2617166* या क्रमांकांवर संपर्क करू शकतात. नागरिकांच्या हितार्थ सदरील कंट्रोल रूम सुरू करण्यात आला आहे.