Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादचिंचोली येथील तोडलेल्या लाकडांचा वन विभागाकडून पंचनामा

चिंचोली येथील तोडलेल्या लाकडांचा वन विभागाकडून पंचनामा

चिंचोली येथील तोडलेल्या लाकडांचा वन विभागाकडून पंचनामा

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यात अवैध धंद्यांचे साम्राज्य वाढत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा महसूल बुडत आहे, असा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. सोमवारी त्यांनी चिंचोली लिंबाजी येथील आरा मशीनवर ठाण मांडत परिसरात पडलेल्या शेकडो टन लाकडांचे पंचनामे करण्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना भाग पाडले.
तालुक्यात महसूल, पोलिस, वनविभाग आणि इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत नसल्याने अवैध व्यावसायिकांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून आमदारांना निधी मिळण्यात अडचणी येतात. परिणामी, तालुक्याचा विकास खुंटला आहे. सर्व अवैद्य व्यवसाय बंद करून, त्यांना अधिकृत परवाने देऊन कायदेशीर व्यवसाय करण्याची सवय लावावी. त्यामुळे शासनालाही महसूल मिळेल आणि आमदारांनाही विकासकामे करता येतील, असेही जाधव म्हणाले.
दरम्यान, चिंचोली लिंबाजी येथील आरा मशीन परिसरात आंबा, लिंब, बाभूळ
लाकूड मोठ्या प्रमाणात साठवले गेले आहे. वनपाल शेख, अनिल इंगळे, के. पी. खोकड, साईनाथ पवार, विलास नरवडे यांनी लाकडांचे घनफूट मोजून पंचनामे करण्यास दुपारपासून सुरवात केली. मात्र, संपूर्ण परिसरात लाकडे अस्ताव्यस्त पडल्यामुळे एका दिवसात सर्व पंचनामे करणे अशक्य असल्याचे वनपाल आर. एम. शेख यांनी सांगितले
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments