चिंचाळा शिवारातील खुनाचा गुन्हा उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा व पाचोड पोलीसांनी आरोपी केले जेरबंद
आत्ताच एक्सप्रेस
विहामांडवा/ दिनांक ०९/०५/२०२५ रोजी पोलीस ठाणे पाचोड हद्दीतील मौजे चिंचाळा शिवारात शेतगट नंबर १२१ मधील विहिरीमध्ये एक शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता त्याच विहिरीत सदर मृतदेहाचे शीर देखील त्याच विहिरीत आढळून आले होते. त्यावरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली सदरचा मृतदेह विहिरीचे मालक नामदेव एकनाथ ब्रम्हराक्षस वय ६५ वर्ष रा. गल्ली नंबर ५ प्रकाशनगर, छत्रपती संभाजीनगर यांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचे निष्पन्न झाले. यावरून मयताचा मुलगा नामे राहूल नामदेव ब्रम्हराक्षस रा. गल्ली नंबर ५ प्रकाशनगर, छत्रपती संभाजीनगर यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे पाचोड येथे गुरनं १७९/२०२५ कलम १०३(२) भान्यासा प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना अतिशय गंभीर असल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासा बाबत मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तातडीने उघड करण्याच्या सूचना केल्या होत्या.
मा. वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाआधारे श्री. सतिष वाघ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांनी त्यांचे पथक सपोनि पवन इंगळे व अमलदार यांना मार्गदर्शन व सूचना देऊन पथकासह घटना घडली त्यादिवशी पासून सतत ०८ दिवस सदर गुन्ह्याचा सातत्याने समांतर तपास केला.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक व पोलीस ठाणे पाचोडचे अधिकारी व अमलदार नमूद गुन्हयांचे संदर्भाने वेगवेगळया प्रकारे पाचोड, पैठण भागात संशयीत इसमांना विचारपूस करत होते. दिनांक-१६/०५/२०२५ रोजी गोपनीय बातमीदार यांच्या माहितीच्या आधारे चिंचाळा गावातील दोन संशयित इसम नामे १) बाबासाहेब सखाराम ब्रम्हराक्षस वय ३३ वर्ष २) आबासाहेब सखाराम ब्रम्हराक्षस वय ३० वर्ष यांना ताब्यात घेवून गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी शेतीच्या वादाचा राग मनात धरुन नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस ठाणे पाचोड करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. विनयकुमारमध्ये डॉ. राठोड, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सौ.अन्नपूर्णा सिंग मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्त असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सतीश वाघ, सपोनि पवन इंगळे, सुधीर मोटे, सफळ/लहू थोटे, पोह/श्रीमंत भालेराव, पोह/ विठ्ठल डोके, पोह/ वाल्मिक निकम, पोह/शिवानंद बनगे, पोना अशोक वाघ, पोह/विजय धुमाळ, पोह. अ/ योगेश तरमळे, जीवन घोलप, चापोन/ शिवाजी मगर आणि पाचोड पोलिस स्टेशनचे अधिकारी सपोनि. शरदचंद्र रोडगे, पी.यू.पी. ज्ञानेश्वर राडकर, पोना/नागनाथ सेंटर, सदरची कामगिरी केली.