शिवछत्रपती महाविद्यालयात छत्रपती संभाजी राजेंचा राज्याभिषेक दिन संपन्न
जालना/प्रतिनिधि/ छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दि.16 जानेवारी 1681 रोजी किल्ले रायगडावर संपन्न झाला.हा दिन केवळ इतिहासातील एक दिवस नसून,तो धैर्य,ज्ञान,राष्ट्रनिष्ठा आणि बलिदानाचा तेजस्वी संकल्प आहे असे गौरवोद्गार प्रा.नितीन चित्ते यांनी काढले.पाचोड येथील शिवछ्त्रपती महाविद्यालयात बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिनानिमित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.चंद्रसेन कोठावळे होते.प्राचार्य डाॅ.भाऊसाहेब आंधळे आणि प्राचार्य डाॅ. बी.डी.मुंडे यांची विशेष उपस्थिती होती.प्रारंभी स्वराज्यनिर्माते छ्त्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.वयाच्या 23 व्या छत्रपती मुकुट धारण केलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा स्विकारताना राजसत्ता ही भोगासाठी नव्हे,तर जनतेच्या रक्षणासाठी व न्याय, स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठीची पवित्र जबाबदारी मानली.एकूण 121 किल्ले जिंकणारे छत्रपती संभाजी राजे यांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची,आणि सत्यासाठी अखेरपर्यंत लढण्याची प्रेरणा आहे असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. चंद्रसेन कोठावळे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. संतोष चव्हान यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपप्राचार्य डाॅ.शिवाजी यादव यांनी तर उपस्थितीतांचे आभार डाॅ.गांधी बानायत यांनी मानले.कार्यक्रमास डाॅ.उत्तम जाधव,डाॅ.हरिप्रसाद बिडवे,डाॅ.सुरेश नलावडे,डाॅ.तुकाराम गावंडे,डाॅ.विठ्ठल देखने,प्रा.सचिन कदम,प्रा.संदीप सातोणकर,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.