बालाजी चौक -राजुर चौफुली रोडवर खड्डेच खड्डे मनपाने दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन- जीवन सले
जालना/प्रतिनिधी/ जालना शहरातील बालाजी चौक ते राजुर चौफुली पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहे. या रस्त्याची दुरूस्ती करून, रस्त्यावर पथदिवे सुरू करावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा जालना मनपाचे माजी आरोग्य सभापती जीवन सले यांनी दिला आहे. जालना मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शहरातील अत्यंत महत्वाचा बालाजी चौक ते राजुर चौफुली पर्यत रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे. या रस्त्यावर ढवळेश्वर महादेव मंदिर आहे. 10-12 दिवसाने श्रावण महिना लागेल. श्रावण महिन्यात दररोज 1500 ते 2 हजार भाविक भक्त दर्शनासाठी येथे येतात.
