Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादछत्रपती संभाजीनगर परिमंडलात वर्षभरात 50 हजार ग्राहकांना वीजजोडणी

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वर्षभरात 50 हजार ग्राहकांना वीजजोडणी

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वर्षभरात 50 हजार ग्राहकांना वीजजोडणी

मागेल त्याला वीजजोडणी देण्यावर महावितरणचा भर

छत्रपती संभाजीनगर : ‘सुकर जीवनमान’ (इझ ऑफ लिव्हिंग) संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी अशा विविध वर्गवारीतील 50 हजारांहून अधिक ग्राहकांना गेल्या वर्षभरात नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

         नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी  सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग‍’ संकल्पना आणली आहे. वीज ही आज मुलभूत गरज बनलेली असल्याने अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा समावेश या संकल्पनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर परिमंडलात महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेले निर्देश आणि वीज नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या कृती मानकांनुसार विहित कालावधीत नवीन वीजजोडणी देणे, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासह ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 2024-2025 या आर्थिक वर्षात विविध वर्गवारीतील एकूण 50 हजार 466 नवीन ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या 41 हजार 767 ही घरगुती ग्राहकांची आहे. या कालावधीत वाणिज्यिक वर्गवारीतील 5 हजार 277 ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. नवीन वीजजोडणीत 1 हजार 304 कृषी ग्राहकांचा समावेश असून औद्योगिक (लघुदाब) वर्गवारीतील हजार 96 नवीन ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा योजना, पथदिवे व इतर 1 हजार 22 ग्राहकांचा यात समावेश आहे.

परिमंडलांतर्गत या कालावधीत छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 13 हजार 707, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात 22 हजार 559 व जालना मंडलात 14 हजार 200 नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

2024-25 या आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 50 हजारांहून अधिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली ही समाधानाची बाब आहे. वीजजोडणी देण्याचा वेग आणखी वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच नियामक आयोगाच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी  परिमंडलातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत.

 पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण, छत्रपती संभाजीनगर

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments