Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादशेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन

शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन

शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन
जालना – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर करण्यात आलं आंदोलन
महामार्गावर पत्ते खेळत शेतकऱ्यांनी केला राज्य सरकारचा निषेध
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी
 जालना/प्रतिनीधी/ da दिनांक 24 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता जालन्यात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय. जालना – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी महामार्गावर पत्ते खेळून राज्य सरकारचा निषेध केलाय. महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्याप पर्यंत महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाहीये. त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून आज राज्यभरात शेतकऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यात सुद्धा जालना – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी पत्त्यांचा डाव मांडत पत्ते उधळून आंदोलन केलंय. यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आलीय. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आलीये. या चक्काजाम आंदोलनामुळे जालना – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments