खुलताबाद तहसीलदारांवर CDR चौकशीची मागणी,तक्रार तथ्यहीन — तहसीलदार संतोष गुट्टे यांचा ठाम दावा
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्याचे तहसीलदार संतोष गुट्टे व त्यांच्या वाहनचालकाचा मागील दोन महिन्यांतील कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासून सखोल चौकशी करावी,अशी मागणी एकलव्य संघटनेचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष हितेश रमेश ठाकरे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.या बाबत दिलेल्या निवेदनात तक्रारी नुसार,तहसीलदार गुट्टे दोन महिन्यांपूर्वी रुजू झाल्यापासून तालुक्यात अवैध वाहतुकीत वाढ झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच तहसीलदार व त्यांच्या वाहनचालकांकडून काही अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप ही करण्यैत आला आहे.
खुलताबाद तालुका पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेरूळ लेणी तसेच बारावे ज्योतिर्लिंग असलेले घृष्णेश्वर मंदिर येथे देश-विदेशातून दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात.अशा परिस्थितीत येथून होणाया अवैध वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढत असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या CDR तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी व दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.
