गृह वस्तूंचा कॅम्प झालेल्या बांधकाम कामगारांनी गृह वस्तूंचा लाभ घ्यावा — शफीक भाऊ,परमेश्वर सोळंके
बहुजनांचे नेते बाबूरावजी पोटभरे यांच्या हस्ते होणार वाटप सोहळा.
माजलगांव/प्रतिनिधी/ माजलगांव शहरामधील वैष्णवी मंगल कार्यालय येथे दिनांक १८/४/२०२५रोजी नोंदीत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तुचा ऑनलाईन कॅम्प घेण्यात आला होता.
त्याच नोंदीत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तुचा दिनांक १५/०६/२०२५ रविवार रोजी दुपारी ठीक १:०० वाजता बजाज कॉम्पलेक्स मध्ये दूसरा मजल्यावर व्यंकटेश हॉल येथे वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व नोंदित कामगारांनी उपस्तित राहून गृह वस्तुचा लाभ घ्यावा असे शेख हमीद (शफीक भाऊ) व परमेश्वर सोळंके यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला रमेशरावजी आडसकर अंबा साखर का.अंबाजोगाईचे चेअरमन, अमर शेख महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनाचे संस्थापक अध्यक्ष, गंगाधर नाना काळकुटे, दैनिक सूर्योद संपादक राजेश्वर चव्हाण जिल्हा अध्यक्ष (रा.कॉ.पा.अ.प.गट) शीतल ताई धोंडरे, (जनसेविका) जयदत्त नरवडे (सभापति कृ.ऊ.बा.स.)श्रीहरी नाना मोरे (उपसभापति कृ.ऊ.बा.स)खलील पटेल (शहर अध्यक्ष रा.कॉ.पा.अ.प.गट) तालेब भैय्या चाऊस (मा.गट नेते न.प.) समीर शेख (क्रांतिकारी शि.सं. मराठवाडा सचिव) मुजम्मिल पटेल (समाज सेवक) मा.सौ.रुपाली कचरे,मा.सौ सुनीता नेटके, मा. शेख अदनान, बाबा शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितित होणार वाटप.