बोगस एनए प्रकरणी अर्थीक गुन्हे शाखेने करावा, आमदार अनुराधा चव्हाण
फुलंब्री /प्रतिनिधी /फुलंब्री येथील गट नंबर १७ मधील बनावट एन.ए. प्रकरण आता चांगलेच चर्चेत आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांनी या प्रकरणावर लक्ष केंद्रीत करत उपविभागीय अधिकारी व सहाय्यक नगर रचना अधिकारी यांना कार्यालय मार्फत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकामार्फत करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
फुलंब्री शहरातील सिल्लोड महामार्गालगत गट नंबर-१७ मध्ये चार ते पाच एकर क्षेत्रात १०६ प्लॉटिंग करून ते १५० लोकांना विक्री करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बनावट सही शिक्के वापरून सहायक नगररचना विभागाचे खोटे रेखांकन या प्लॉटच्या विक्रीसाठी जोडण्यात आले होते. सदरील जागेवरील एन.ए हा बनावट असल्याने सर्वसामान्य नागरीक नाहकच गोत्यात आले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी आला लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. आमदार अनुराधा चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. या प्लॉटधारकांना न्याय देण्यासाठी उपविभागीय २ अधिकारी व सहाय्यक नगर रचना विभागाचे अधिकारी यांनी बनावट सही शिक्याचा वापर केल्याप्रकरणी कार्यालयामार्फत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी दिल्या आहे. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जलद गतीने तपास करून यात दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे बनावट शिक्के वापरुन चुना लावला आहे या प्रकरणी आता काय कारवाई होते, फुलंब्री तालुक्याचे लक्ष लागले आहे.