Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादब्लॅक स्पॉट शोधण्यासाठी पोलीस, परिवहन आणि बांधकाम विभागाने संयुक्त मोहिम राबवावी-...

ब्लॅक स्पॉट शोधण्यासाठी पोलीस, परिवहन आणि बांधकाम विभागाने संयुक्त मोहिम राबवावी- जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश

ब्लॅक स्पॉट शोधण्यासाठी पोलीस, परिवहन आणि बांधकाम विभागाने

संयुक्त मोहिम राबवावी- जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर – ज्याठिकाणी गेल्या तीन वर्षात पाच पेक्षा अधिक अपघात ५०० मीटर परिसरात झाले असतील असे ब्लॅक स्पॉट शोधण्यासाठी पोलीस दल, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली, अधीक्षक अभियंता एस.एस. भगत, उप प्रादेशीक परिवहन अधिकारी स्वप्नील माने, डॉ. महेश लढ्ढा, महामार्ग पोलीस अधीक्षक रुपाली दातेकर, कार्यकारी अभियंता एस.जी. केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात महामार्ग, राज्य मार्ग यांवरील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना, दर्शक सुचना फलक लावणे, वेग मर्यादा दर्शक फलक लावणे, महामार्गावर अनधिकृतरित्या डिव्हायडर तोडून ठेवले आहेत,ते पुन्हा स्थापीत करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करणे  आदी उपाययोजना राबवाव्या. जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण शून्यावर आणणे, अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करुन मृत्यूदर शून्यावर आणणे या उद्धिष्टांसह हे काम साऱ्यांनी करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments