भाजपच्या बालेकिल्ल्यात सत्कार सोहळ्याचा धडाका! अनिता ज्ञानेश्वर मोठे यांची जिल्हा परिषद सभापती पदी वर्णी; गुलाबराव कोलते यांच्या हस्ते जंगी सत्कार
सावळदबारा/प्रतिनिधी/ छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या भाजपचा मोठा बोलबाला पाहायला मिळत असून, रिक्त असलेल्या सभापती पदावर अनिता ज्ञानेश्वर मोठे यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. या निवडीनंतर सावळदबारा परिसरात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने अनिता मोठे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना जिल्हा परिषदेत मोठी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीचे औचित्य साधून भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी नवनिर्वाचित सभापतींचा विशेष सत्कार केला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सत्कार प्रसंगी बोलताना गुलाबराव कोलते यांनी विश्वास व्यक्त केला की, “अनिता मोठे यांच्या निवडीमुळे सोयगाव आणि परिसरातील जनतेला न्याय मिळेल आणि भाजपची ताकद तळागाळापर्यंत पोहोचेल.”
