मुख्यमंत्री फडणवीसांचे वाढदिवसानिमित्त कन्नड नगरीत भाजपाचे वतीने पार पडले भव्य रक्तदान शिबीर
कन्नड/ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसा निमित्त कन्नड तालुका भाजपाचे वतीने शहरातील पक्ष कार्यालयात भव्य रक्तदान शिबीर पार पडले.
या पार पडलेल्या शिबिरास पक्षाच्या अनेक मान्यवरांनी भेट देऊन रक्त दानासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूध्वनी द्वारे शुभेच्या दिल्या,ज्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते,युवा उद्योजक मनोज पवार,उत्तमराव राठोड, डॉ.बाळासाहेब जाधव,कन्नड परीमंडळाचे सर्वेसर्वा तथा आयोजक सुनील पवार,काकासाहेब तायडे, विष्णू राठोड, सुदाम पवार,स्वप्निल जागीरदार,संगेश भारुका,पवन ठाकूर, रुपेश भारूका, शंकर राऊत, दानिश भाई शेख, इमरान शेख, रोहित कनगरे, रवी भालेराव,संदीप कांबळे, अमोल जाधव, सौरभ कुलकर्णी, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष कोमल खरे, वर्षाताई यासह छत्रपती संभाजीनगर येथून आलेले दत्ताजी भाले रक्तपेढीचे अधिकारी प्रशांत चिटणीस व त्यांचे संपूर्ण टीमच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य रक्तदान शिबीर पार पडले,यात अनेकांनी रक्तदान करून देश सेवेचे व्रत निभावले.रक्त दत्त्यांना शेवटी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.