डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पुण्यतिथीनिमित्त बलिदान दिन भाजपा जालना महानगर च्या वतीने साजरा
“संकल्प से सिद्धी”- मोदी सरकारचे यशस्वी ११ वर्ष अभियानांतर्गत
जालना महानगरमध्ये मंडळस्तरावर संकल्प सभा व वृक्षारोपण
जालना/प्रतिनिधी/ भारतीय जनसंघाचे संस्थापक व राष्ट्रहितासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारे, बलिदानी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक २३ जून रोजी भाजपा जालना महानगर जिल्ह्यात भाजपा जिल्हा कार्यालयात व सर्व मंडळामध्ये व बलिदान दिन साजरा करण्यात आला. “संकल्प से सिद्धी-मोदी सरकारची ११ यशस्वी वर्षे” या उपक्रमांतर्गत मंडळ स्तरावर संकल्प सभा व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, विजय कामड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन जालना मंडळ, जुना जालना मंडळ, पूर्व जालना मंडळ आणि महानगर ग्रामीण मंडळात विविध ठिकाणी करण्यात आले.
- नवीन जालना मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील खरे यांनी सांगितले “डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे बलिदान म्हणजे भारताच्या एकतेसाठी दिलेली अजरामर प्रेरणा आहे. त्यांच्या विचारांनीच आजची तरुण पिढी राष्ट्रासाठी कार्य करण्याचा संकल्प करते.
- जुना जालना मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश निकम म्हणाले, बलिदान दिन हे केवळ स्मरण नव्हे, तर एक प्रेरणादायी क्षण आहे. आपण सर्वांनी त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांना कृतीत उतरवले पाहिजे.
- पूर्व जालना मंडळाचे अध्यक्ष श्री. अमोल धानुरे यांनी व्यक्त केले, मुखर्जींचा संकल्प म्हणजे भारताच्या आत्मनिर्भरतेचा पाया. आजचा कार्यक्रम हा त्या विचारांची कृती आहे.
- महानगर ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय डोंगरे म्हणाले, “देशासाठी झटणं हीच खरी श्रद्धांजली आहे. वृक्षारोपण आणि संकल्प सभा यामुळे युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बंधू-भगिनीं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमांमध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांची उजळणी करण्यात आली. त्यांच्या त्यागाचे स्मरण करत उपस्थितांनी राष्ट्रनिर्मितीसाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प केला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मंडळ स्तरावर वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.
सोपान पेंढारकर, अर्जुन गेही, सकुबाई पणबिसरे, शुभांगी ताई देशपांडे, वर्षा ठाकूर, ममता कोंड्याल, उषाबाई धुमाळ, किर्ती आर्य, प्रभुलाल गोमतीवाले, राजेंद्र भोसले सर, रवी अग्रवाल, देवीदास देशमुख, राजेश जोशी, सिद्धीविनायक मुळे, सुनील पवार, शिवराज जाधव, राजु गवई, अनिल सरकटे, विष्णू भुतेकर, नेमिचंद भुरेवाल, सुजित जोगस, सुमित सुरडकर, विकास कदम, रतन आर्य, बाबुराव भवर, सोमेश काबलिये, जगदीश येनगुपटला, डोंगरसिंग साबळे, आकाश देशमाने, तुकाराम बखळे, बद्रीनाथ वाघ, रोहित नलावडे, बबलु नंद, नितिन भगत, उमेश पेंढारकर, चंदन मिश्रा, आक्षिश साखरे, आमोल भालेराव, राम व्यवहारे, संजय साखरे नितिन नरवये, सतोष पांढरे, राधाकिसन वाघचौरे, पारचा भाऊ, रणजित रिडला, सतोष यादव, मोहन सूर्यवंशी, सुभाष अंबेकर व किरण देशमुख आदींसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
