भाजपा पक्ष श्रेष्ठीने उमरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली लढवाव्यात
लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी / प्रतिनिधी/ मा. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२५ पुर्वी घ्यावे असा आदेश महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिलेला आहे. उमरी तालुक्यातील नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यत्व तीन वर्षांपूर्वी बरखास्त झालेले असुन संबंधित कार्यालयात प्रशासक राज चालू असुन त्यांचा मनमानी कारभार चालु आहे. सर्व सामान्य नागरिकांचे कोणतेच कामे वेळेवर होत नाहीत. यामुळे उमरी तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी या प्रशासकीय अधिका-याच्या वागणुकीला वैतागून गेलेली आहे.
सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करून प्रत्येक जाती धर्माच्या सुखा दुखात धावुन जाऊन २४ तास जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. रात्री बेरात्री शेतकरी व कार्यकर्त्यांचा फोन उचलून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे आणि शेतकरी व कष्टकरी, कामगार, कर्मचारी, बेरोजगारांचा अन्न दाता मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांना तळागाळातील जनसामान्य कार्यकर्त्याची जनतेची जाणीव आहे.
कै.आ.बाबासाहेब देशमुख गोरठेकर व माजी आ. कै.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली त्या काळी उमरी तालुक्यातील नगर परिषद उमरी, पंचायत समिती उमरी, जिल्हा परिषद तळेगाव गट व गोरठा गटांचे उमेदवार अनेक वेळा निवडून आणलेले असुन राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. उमरी नगर परिषद, पंचायत समिती व नांदेड जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा फडकावयचा असेल तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ अजित गोपछडे, आ.राजेश पवार, भाजपाचे नांदेड ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे इत्यादी पक्ष श्रेष्ठीने विचार पुर्वक निर्णय घेऊन शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली उमरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात असे मत भाजपाचे माजी उमरी तालुकाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य किशनदादा गायकवाड कुदळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केलेले आहेत.
– किशनदादा गायकवाड कुदळेकर