भोगलवाडी नंतर आंबेवडगावात बॅनर प्रकरणावरून तणाव,काही व्यक्तींवर गुन्हा नोंद
आत्ताच एक्सप्रेस
बीड/प्रतिनिधी/ धारूर तालुक्यात पुन्हा एकदा बॅनर प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. आंबेवडगाव येथे मराठा समाजाने मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आरक्षण संदर्भातील निर्णयाचे स्वागत करण्यासाठी अभिनंदनाचे बॅनर लावले होते. मात्र या बॅनरवर आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून मोठ्या संख्येने बांधव आंबेवडगाव स्टँडवर जमा झाले होते.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी किल्ले धारूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंबेवडगाव, खामगाव, पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांची गर्दी वाढल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महामार्गावर गर्दी वाढल्याने परिसरात तणावाचे वातावरण ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट पोलिस बंदोबस्तात बँनर धारूर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.तसेच काही व्यक्तींनी त्या बॅनरवर काही समाजामध्ये तेड निर्माण होईल अशे वक्तव्य लिहिले होते.त्यामुळे काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.