Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबादआकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 24 जणांवर गुन्हा दाखल भोकरदन तालुक्यातील तीन...

आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 24 जणांवर गुन्हा दाखल भोकरदन तालुक्यातील तीन गावांत महावितरणची कारवाई

आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 24 जणांवर गुन्हा दाखल

भोकरदन तालुक्यातील तीन गावांत महावितरणची कारवाई

जालना : भोकरदन तालुक्यातील कोदा, वाकडी व जळगाव सपकाळ या गावांत महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत आकडे टाकून वीजचोरी  होत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी 24 जणांवर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महावितरणच्या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

महावितरणच्या आन्वा शाखेचे कनिष्ठ अभियंता प्रदीप गव्हांडे यांनी सहकाऱ्यांसह विविध गावांत वीजचोरी तपासणी मोहीम राबवली. कोदा गावात ताराचंद रामदास फुसे, दिलीप मंजीतराव व्यवहारे, सीताराम काळूबा बावस्कर, ऋषी उत्तम घनघाव, संजय रामदास फुसे, शांताबाई रमेश घनघाव, अशोक विठोबा दांडगे, आनंदा भीमराव बदर, महादू रघुनाथ बोराडे, रतन हरिभाऊ बोराडे, उत्तम पंडित बोराडे व नारायण त्रंबक बोराडे हे लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून घरासाठी वीजचोरी करताना आढळून आले. त्यांनी 12 महिन्यांपासून 10 हजार 592 युनिट वीजचोरी करून महावितरणचे 1 लाख 71 हजार 360 रुपयांचे नुकसान केले. प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे त्यांना 24 हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले.

वाकडी गावात देवा विठ्ठल निकम, कैलास मोतीराम वाघ, सांडू भवर, राजू दादुबा बावणे, अंबादास बाळा बावणे, म्हातारजी तुकाराम पाडळे, अंकुश सखाराम पाडळे, कैलास सखाराम पाडळे, सुमित सुनील साळवे, अशोक कडूबा साळवे व बाळू उत्तम साळवे हे आकडा टाकून घरगुती वापरासाठी वीजचोरी करताना आढळून आले. त्यांनी 12 महिन्यांपासून 6 हजार 569 युनिट वीजचोरी करून महावितरणचे 1 लाख 39 हजार 920 रुपयांचे नुकसान केले. प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे त्यांना 22 हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले.

        जळगाव सपकाळ गावात वॉटर फिल्टर चालवणारा गोकुळ साहेबराव सपकाळ (मोहित ॲक्वा) हा आकडा टाकून वाणिज्यिक वापरासाठी वीजचोरी करताना आढळून आला. त्याने 12 महिन्यांपासून 1209 युनिट वीजचोरी करून महावितरणचे 37 हजार 677 रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यास 10 हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले.

        सहायक अभियंता प्रदीप गव्हांडे यांच्या फिर्यादीवरून सर्व 24 आरोपींवर भोकरदन पोलिस ठाण्यात विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments