Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादऔरंगाबादभाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी...

भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत जालन्यातील 800 लाभार्थी आयोध्यासाठी रवाना*
भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी
जालना (प्रतिनिधी)  महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गानं प्रवास करत असतात, याच पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना प्रवास मोफत असणार आहे.
याच योजनेअंतर्गत निवड केलेले जालना जिल्हयातील जवळपास 800 लाभार्थी (राम भक्त) आज दि.06 एप्रिल रोजी जालना रेल्वे स्थानकातून संध्याकाळी 7.00 वा प्रवासा करिता रवाना झाले आहेत, भक्तांच्या या सुखकर प्रवासासाठी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी आ.नारायण कुचे, बद्रीनाथ पठाडे, राजेश राऊत, सतीश जाधव, अर्जुन गेही, सिद्धिविनायक मुळे, शशिकांत घुगे, धनराज काबलीये, सुनील आरदड, स्टेशन प्रबंधक विनोद भारती, समाज कल्याण अधिकारी गीता कुटे आदींची उपस्थिती होती.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments