कन्नड भाजपा नुतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
कन्नड उदय कुलकर्णी भारतीय जनता पक्षाचे वतीने
छ.संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री.संजय खंबायते यांचे आदेशाने नुकतीच कन्नड तालुक्यातील पक्षाच्या नुतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
पक्षाचे कन्नड विधानसभा मध्यमंडळ अध्यक्ष सुनील पवार यांचे नेतृत्वाखाली या नुतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे.या वेळी भाजपा पक्षाचे नेते तथा उद्योजक मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांचे वतीने शहरातील प्रशिद्ध व त्यांचे मालकीच्या असलेल्या श्री.राजुरेश्वर मंगल कार्यालयात सर्व नुतन पदाधिकारी मंडळाचा भव्य सत्कार करण्यात आला आहे.सदर नुतन पदाधिकारी मंडळात खालील प्रमाणे घोषणा करण्यात आली आहे.
1)ता.युवा मोर्चा अध्यक्ष पदी पवन ठाकूर,तालूका सरचिटणीस पदी विष्णू राठोड,सरचिटणीस पदी श्री.कैलास जाधव,ता.महिला मोर्चा अध्यक्ष पदी सौ.प्रतिभाताई माळकर,सचिव पदी सौ.मंगलाताई केवट,ता.महिला उपाध्यक्ष पदी वर्षांताई लहाणे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी दानिशभाई शेख यांची वर्णी लागली असुन या सर्वांना तालुका मध्य मंडळ प्रमुख सुनील पवार यांचे वतीने नियुक्ती पत्रे देण्यात आली आहे.
यावेळी पक्षाचे नेते उद्योजक मनोज पुष्पाबाई केशवराव पवार,मा.पं.स.उपसभापती काकासाहेब तायडे,मनोज देशमुख,सांगेशशेठ भारूका,कोमलताई खरे,संदीप नरवडे,केतन त्रिभुवन,प्रशांत शिंदे,मनीष भैय्या राठोड,शंकर राऊत,सोपान शिरसाठ,अमोल सोनवणे,मालकर,इम्रानभाई,शेख,
खलील भाई शेख,शेख विखार,संदीप कांबळे,छोटू हिरे,कपिल भाई लालवाणी,नवनाथ साळवे,रोहित कांबळे,आदी मान्यवरांची व पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.