भजन स्पर्धेत महावितरणची उत्कृष्ट कामगिरी
सांघिक सर्वोत्कृष्ट तृतीय पारितोषिक
कामगार कल्याण मंडळाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : कामगार कल्याण मंडळ छत्रपती संभाजीनगर गट कार्यालयाच्या वतीने उस्मानपुऱ्यातील ललित कला भवनात ‘पुरुष भजन स्पर्धा 2025-26’ पार पडली. या स्पर्धेत महावितरणच्या संघाने लक्षणीय यश मिळवले.
स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील कामगारांच्या एकूण तेरा संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत महावितरणच्या संभाजीनगर परिमंडलाचा परिपूर्ण संघ या स्पर्धेत तिसऱ्यांदा सहभागी झाला आणि सांघिक तृतीय पारितोषिक पटकावले.
या संघास मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांचे मार्गदर्शन तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांचे सहकार्य लाभले. या संघात नवनाथ पवार, रमेश शिंदे, डॉ.सुधाकर जायभाये, राजेश्वर सूर्यवंशी, वैभव साखरे, अभय एरंडे, भानुदास शेवाळे, अरुण दुबाले, दिगंबर रेंगे, लक्ष्मण वाघ, सदानंद जाधव, दिलीप चंदनशिव व मृदंगवादक जीवन पवार यांचा समावेश होता. भजन संघाचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कामगार कल्याण मंडळाच्या कोतवालपुरा केंद्राचे संचालक जिग्नेश पाटील यांनी अभिनंदन केले. या भजन संघाला वीज उद्योगासह विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात असून, उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी रवींद्र कोल्हारकर, प्रमुख पाहुणे स्टरलाईट इंडियाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी रोहित पाटील, कामगार कल्याण मंडळाचे प्रभारी सहायक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे व कामगार केंद्र संचालक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
