भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवा निमित्त जैन टॅग तर्फे गो दान महा दान या कार्यक्रमाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी /सकल जैन समाज भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समिती व जैन टॅग तर्फे गो दान महा दान या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता चंद्रसागर धर्म शाळा शाहागंज येथे आयोजन करण्यात आले आहे. अहिसं परमो धर्म व जिओ और जिने दो भगवान महाविरांचा संदेश लक्षात ठेवुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५१ गाईसाठी आहार, औषध, व चारेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
तरी कार्यक्रमासाठी सकल जैन समाज बांधवानी उपस्थित राहावे. असे आव्हाण अध्यक्ष श्वेता कासलीवाल, उपाध्याक्ष पुर्वा कासलीवाल, सचिव जयश्री लोहाडे, कोषाध्यक्ष श्वेता गंगवाल यांच्या सह कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन उज्वला पाटणी, किर्ती पाटणी, सिम्मी पाहाडीया, दिपाली पांडे, मिताली काला, सपना पाटणी, यांच्या सह संस्थापीका अध्यक्षा अनुपमा दगडा, दिपीका बडजाते, रिचा कासलीवाल, श्वेता सेठी, मोनीका चांदीवाल, डॉ. याशीका पांडे, छाया कासलीवाल, रचना पाहाडे, नेत्रजा कसलीवाल, रानु सेठी, सिमा बडजाते, सारिका बडजाते, रिना ठेळे, पुजा झाजरी, स्वाती कासलीवाल, यांच्या सह सकल जैन समाजाच्या बांधवाणी केली आहे. अशी माहिती नरेद्र अजमेरा, पियुष कासलीवाल यांनी दिली आहे. कार्यक्रमासाठी भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवा समितीचे पदाधीकारी व सकल जैन समाजाचे बांधव उपस्थित रहाणार आहेत.