भगवा फेटा, नेहरु कट जॅकेट अन् पांढरा सदरा; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचा पेहरावातून खास संदेश
भगवा फेटा, नेहरु कट जॅकेट अन् पांढरा सदरा; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचा पेहरावातून खास संदेश स्वातंत्र्याच्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.अनेक शासकीय कार्यालयांना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. मंत्र्यांच्या हस्ते ठिकठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सलग बाराव्यांदा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या पेहरावाची खास चर्चा असते. त्यानुसार, यंदाचा लूकही काही खास आहे. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारंगी रंगाचा फेटा, नेहरु कट जॅकेट, पांढरा शुभ्र सदरा आणि गळ्यात तिरंगी रंगाचा गमछा परिधान केला आहे. त्यांच्या या खास लूकने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पेहरावातून स्वातंत्र्य, क्रांती आणि शांतीचा संदेश देखील देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 11 वेळा ध्वजारोहण केलं. प्रत्येक वेळी त्यांच्या पेहरावातून काहीना काही संदेश देण्यात आला आहे. त्यानुसार, यंदाच्या पेहरावातूनही भारतीयांना संदेश मिळतोय.
