बीड जिल्हा रुग्णालयातील डॉ. अशोक थोरात निलंबित
बीडचे जिल्हा शल्क चिकिkash Abitkar : त्सक डॉ. अशोक थोरात यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. डॉ. अशोक थोरात यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत केली. यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बीड जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांना निलंबित केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
विधानसभेत आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडत म्हटले की, बीडचे जिल्हा शल्क चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार बीडमध्ये झाला आहे. भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांची या प्रकरणात चौकशी झाली. या चौकशीत ते दोषी सापडले होते. दोषी सापडल्यानंतर त्यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे त्यांनी केले हे माहीत नाही. पण त्यानंतर परत जिथे भ्रष्टाचार झाला तिथे बीडमध्ये त्यांची सिव्हिल सर्जन म्हणून बदली करण्यात आली. हे बरोबर आहे का? जिथे इतका मोठा प्रचंड भ्रष्टाचार झाला, त्यांना पुन्हा इकडे परत कसे आणले गेले? या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का? त्यांचे तुम्ही निलंबन करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बीड जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरातांचं निलंबन
यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत. निश्चितपणाने सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांना आपण सस्पेंड करत आहोत. त्यांना निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल. यात जे दोष आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
कोण आहेत डॉक्टर अशोक थोरात?
– डॉक्टर अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. त्यानंतर बीडहून त्यांची नाशिकला बदली झाली. आता पुन्हा ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीडमध्ये रुजू आहेत. यापूर्वी देखील थोरात बीडमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक होते. त्यानंतर त्यांची बदली नाशिकला करण्यात आली. मात्र ते नंतर बदलून पुन्हा बीडला आले. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा शिवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टर अशोक थोरात यांनी दिला होता. तर अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील हॉटेल चर्चेत आले होते.
