बैलगाडीला दुचाकीची धडक होऊन पिशोर येथील मुलगा ठार
कन्नड / प्रतिनिधी / भरधाव दुचाकी बैलगाडीला पाठिमागून धडकल्याने १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पिशोरजवळील पिशोर सिल्लोड -रस्त्यावरील खडकी नदी पुलाजवळ घडला. जयेश माधवराव जाधव ( १६, रा. पिशोर) असे मृताचे नाव आहे. जवळच्याच एका खेड्यात नात्यातील लग्न असल्याने जयेश या लग्नाला जात होता. दरम्यान खडकी
नदी पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या जयेशच्या दुचाकीने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की बैल गाडीचा साठा तुटून दोन तुकडे झाले या अपघातात जयेश गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांनी त्याला मृत घोषित केले. तपास बिट जमादार परमेश्वर दराडे करीत आहे