भाटेपुरी येथील आकाश गोरे या तरुणाने यूपीएससी परीक्षेत मिळवले नेत्रदीपक यश : जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी केला सत्कार
जालना / प्रतिनिधी/ केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या वतीने
घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये जालना
तालुक्यातील भाटेपुरी येथील आकाश पुंजाराम गोरे या तरुणाने नेत्रदीपक यश
मिळवले. त्याने यापूर्वी वैद्यकीय शिक्षण घेऊन एमबीबीएस परीक्षेतही
राज्यात १४ वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले होते.
मागील वर्षी यूपीएससीच्या वतीने घेतलेल्या परीक्षेत अगदी कमी गुणांनी
यशाने त्याला हुलकावणी दिली होती. परंतु तरीही निराश न होता पुन्हा
त्याने जोमाने प्रयत्न केले व अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातील या तरुणाने
यश खेचून आणले व जिल्ह्याचा नावलौकिक केला. त्याच्या या यशाबद्दल शिवसेना
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी त्याच्या भाटेपुरी येथील
निवासस्थानी जाऊन त्याचा आई -वडिलांसह यथोचित गौरव केला. यावेळी
त्यांच्या समवेत माजी जि.प.सदस्य यादवराव राऊत, शांतीलाल गोरे, प्रा.राम
कदम, नंदकुमार जाधव यांच्यासह विष्णु बोंद्रे, शांतीराम बोंद्रे,
गोविंदराव गोरे, तुकाराम गाडेकर, विक्रम काळे, किसनराव चौधरी,रामेश्वर
गोरे, तुकाराम गोरे, निवृत्ती गोरे, कचरू वाघमारे, अशोकराव गोरे, विकास
काळे, बाबासाहेब कावळे, ऋषिकेश गोरे, भगवान गोरे, अमोल गोरे कचरू
वाघमारे, कैलास गोरे, वैभव गोरे, पुंजाराम गोरे, विकास गोरे आदींची
यावेळी उपस्थित होती.
