Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादबाप्पा पुढल्या वर्षी येण्यासाठी निघाले अनब हुरहुर वाढल लवकर येण्यास निघाला माझा ...

बाप्पा पुढल्या वर्षी येण्यासाठी निघाले अनब हुरहुर वाढल लवकर येण्यास निघाला माझा  अशाप्रकारे घरोघरी प्रत्येकाचा कंठ दाटून आला

बाप्पा पुढल्या वर्षी येण्यासाठी निघाले अनब हुरहुर वाढल लवकर येण्यास निघाला माझा  अशाप्रकारे घरोघरी प्रत्येकाचा कंठ दाटून आला
 कन्नड/प्रतिनिधी/ सुनिल निकम कन्नड तालुक्यातील नादरपुर पिंपरखेडा जवखेडा सारोळा नाचनवेल पिशोर चिंचोली परिसरात  लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आली अवघ्या भक्तांना हुरहुर लागली…. गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या… अशा आनंदाश्रुत गणपती बाप्पा विसर्जित करण्यात आले… या विसर्जनामुळे बाल गोपाळ घरी परतले, तेव्हा मात्र घर रिकामे झाले.  पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर ! अशाप्रकारे घरोघरी प्रत्येकाचा कंठ दाटून आला. दहा दिवसांपूर्वी गणपती बाप्पाचे घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळात आगमन झाले. मनोभावे मोठ्या श्रद्धेने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. निसर्गाची साथ नसली तरी मंगलमय वातावरण व उत्साहाची कुठेही उणीव दिसून आली नाही. दहा दिवस सर्वत्र आरती धार्मिक कार्यक्रमांमुळे भक्तीचा महिमा गायला गेला. त्यामुळे ती एक सवयच लागली, सवय ही मानवी स्वभावाला एक देन असून ती लवकर सुटत नाही हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे ज्यावेळी लाडक्या बाप्पाला दहा दिवसानंतर निरोप देण्याची वेळ आली, त्या घटिकेला मात्र प्रत्येकाच्या मनाला हुरहुर लागली. घरोघरी पाहुणचार स्वीकारल्यानंतर पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या सर्वांची रजा घेत आहेत. ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात भक्तिमय वातावरणात जड अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप दिला गेला. सार्वजनिक मंडळ असो अथवा निवासस्थान असो सर्वत्रच गणपती बाप्पाचा जयघोष झाला. दहा दिवस मंत्रोपचाराने वातावरण बहरुन गेले. या काळातील दिवसांनी गणेशभक्तीचा महिमा आणखी समृद्ध करून टाकला. बाप्पांच्या
वास्तव्याने जनजीवन भक्ती रसात न्हाऊन गेले. बाप्पांच्या वास्तव्याने गतिमान जीवनातील ताणतणावांकडे दुर्लक्ष करून सर्वजण एका वेगळ्या आनंदात तल्लीन झाले होते. त्यामुळे आता बाप्पांना निरोप देताना साऱ्यानाच चुकल्याचुकल्यासारखे वाटले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना ‘घेता निरोप तुमचा देवा आम्हा सदा सुखी तुम्ही ठेवा. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. निरंतर आमची चिंता देवा तुम्हा असावी. असे साकडे घालत सर्व गावकरी जय भंवानी गणेश मंडळ नवतरुण गणेश मंडळ जय बजरंग गणेश मंडळ यांनी पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे साहेब व नादरपुर येथील पोलीस पाटील रामकिसन सोनवणे तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मोलाची सहकार्य केले या वेळी गांवकरी उपस्थिती होते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments