Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादबँकेने वारंवार आधार कार्ड व पॅन कार्ड ग्राहकास मागून वेठीस धरू नये!...

बँकेने वारंवार आधार कार्ड व पॅन कार्ड ग्राहकास मागून वेठीस धरू नये! बाबासाहेब वानखेडे यांची मागणी

बँकेने वारंवार आधार कार्ड व पॅन कार्ड
ग्राहकास मागून वेठीस धरू नये!
बाबासाहेब वानखेडे यांची मागणी

 

जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयकृत व खाजगी बँका पुन्हा-पुन्हा ग्राहकांना आधार कार्ड, पॅनकार्ड मागवून ग्राहकास वेठीस धरीत आहे. खाते उघडतांना बँक आधार कार्ड, पॅनकार्ड घेवूनच खाते उघडल्या जाते. त्यानंतर पुन्हा-पुन्हा  आधार कार्ड, पॅनकार्ड मागण्याची गरज काय? असा प्रश्‍न मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी उपस्थित केला. यासंदर्भात अर्थमंत्री सितारामन्, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हरर्नर, जिल्हाधिकारी व लिड बँकेचे महाव्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
याबाबत श्री. वानखेडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारतीय स्टेट बँकेसह राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका खाते उघडल्यानंतर आधार कार्ड व पॅन कार्डची मागणी करून, खात्याला लिंक करायचे, केवाआयसी करायची असे सांगतात.  परंतू खाते उघडतांना ग्राहकांचा आधार कार्ड व पॅनकार्ड खात्याला लिंक का केल्या जात नाही, पुन्हा -पुन्हा आधार कार्ड व पॅनकार्ड कश्यासाठी मागितल्या जाते. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तरी आता येथून पुढे बँकेने ग्राहकांना एकदा आधार कार्ड व पॅन कार्ड घेतल्यानंतर पुन्हा – पुन्हा त्याच कागदपत्राची मागणी करू नये, अशी मागणी वानखेडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments