Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादसांगली सिविल हॉस्पिटल येथे  जिल्हा परिचारिका संघटनेच्या वतीने एक दिवसाचे काम बंद...

सांगली सिविल हॉस्पिटल येथे  जिल्हा परिचारिका संघटनेच्या वतीने एक दिवसाचे काम बंद आंदोलन संपन्न !

सांगली सिविल हॉस्पिटल येथे  जिल्हा परिचारिका संघटनेच्या वतीने एक दिवसाचे काम बंद आंदोलन संपन्न !
मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 18 जुलै पासून जिल्ह्यातील सर्व परिचारिका बेमुदत संपावर जाणार: सुलताना जमादार
इस्लामपूर/प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सांगली जिल्हा यांच्यावतीने आज परिचारिकांच्या विविध मागण्यासाठी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला संघटनेच्या अध्यक्ष सुलताना जमादार यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली सिविल हॉस्पिटलच्या बाहेर आज काम बंद आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सांगली सिविल हॉस्पिटल च्या सर्व परिचारिका सहभागी झाल्या होत्या त्यांनी दिलेल्या निवेदनात खालील प्रमाणे प्रमुख मागण्या केल्या आहेत सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका यांना प्रशासकीय बदली मधून सूट द्या वेतन त्रुटी दूर करा केंद्र शासनाप्रमाणे सर्व भत्ते लागू करा, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती बंद करा, सरळ सेवेने पदभरती व पदोन्नतीने भरती करताना ९०/१० धोरण रद्द करा ग्रामीण रुग्णालयात निरसित केलेली परिसेविकेची पदे पुनःरजिवित करा बायोमेट्रिक हजेरी सक्ती पद्धत बंद करा शासकीय निवासस्थानामध्ये राहण्याची सक्ती रद्द करा परिचर्या संवर्गाचे स्वतंत्र संचालक सहसंचालक पद निर्माण करा नरसिंग विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनामध्ये वाढ करा इत्यादी 10 ते 11 मागण्यांचे निवेदन आज काम बंद आंदोलन करून देण्यात आले आज जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दिनांक 18 जुलै 2025 पासून सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा परिचारिका संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुलताना जमादार व उपाध्यक्ष श्रीमती पुनम दौंडे यांनी दिला आहे यावेळी आंदोलन स्थळी सर्व परिचारिका यावेळी वनिता काटे सुरेखा कोळी योगिनी हिरकुर श्री विकास तांबे धनाजी जाधव रूपाली भुसारी आदी परिचारिका व यावेळी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments