आ प्रशांत बंब यांच्या संपर्क कार्यालयासमोर आषाढी एकादशी निमित्ताने भजन, गवळण, अभंग अशा विविध गाण्यांनी मंत्रमुग्ध
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी लासुर स्टेशन आषाढी एकादशी निमित्त आमदार प्रशांत बंब मित्र मंडळ आयोजित “गजर विठ्ठलाचा सोहळा आनंदाचा” या भक्तीमय संगीत कार्यक्रमात भजन, गवळण, अभंग अशा विविध धार्मिक गाण्यांनी लासुर स्टेशन कर (दि.६ जूलै रविवार रोजी मंत्रमुग्ध झाले.आ बंब यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात डॉ.बन्सीलाल बंब, सौ. कांचन बंब, सुरेश मुनोत, प्रीतम मुथा,बाजार समितीचे सभापती शेषरावनाना जाधव, उपसभापती अनिल चव्हाण, सुरेश जाधव,मनीष पोळ,आप्पासाहेब जगदाळे, सरपंच मीना पांडव,भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, अमोल जाधव. यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची पूजा करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरवातीला जय जय रामकृष्ण हरी, रूप पाहता लोचनी, कानडा राजा पंढरीचा, अवघे गरजे पंढरपूर, मन मोहन मुरलीवाला अशा विविध भजन अभंग गवळणींनी गाऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान आषाढी एकादशी च्या महुर्तावर या कार्यक्रमात भाविकांना साबुदाणा खिचडी, केळीचे वाटप करण्यात आले.
दरम्यान यावेळी संगीत विशारद गायक प्रा. आणासाहेब आढाव, तबला विशारद प्रा. शिंदे आणि सह कलाकारांनी एका पेक्षा एक सरस गाणे गाऊन आषाढीचे वातावरण भक्तिमय केले. यावेळी माजी संचालक महेंद्र पांडे, ग्राम पंचायत सदस्य कल्याण पवार, संजय पांडव यांच्यासह अजय भिसे, रवी इंगळे, नारायण निकम, संतोष काटखा, शुभम मढीकर, राहुल मुंजाळ, कृष्णा लांडगे, चेतन मढीकर अर्जुन चव्हाण आदींसह वारकरी, गावकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.