बालविकास प्राथमिक शाळेत संस्थेच्या
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ
जालना/प्रतिनिधी/ कसबा येथील महिला मंडळ जुना जालना संचलित श्रीमती प्रभावतीबाई कोळेश्वर बालविकास प्राथमिक शाळेत शुक्रवार दि. 12 सप्टेंबर रोजी महिला मंडळाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर सत्कारमूर्ती नूतन अध्यक्ष सौ. विद्याताई कुलकर्णी, माजी अध्यक्ष सौ. सीमाताई देशपांडे, उपाध्यक्ष सौ. विजयाताई बागुल, सचिव सौ. सुनंदाताई बदनापूरकर, सहसचिव सौ. सुषमाताई पायगव्हाणे, कोषाध्यक्षा सौ. मीराताई देशपांडे, बालवाडी विभागाच्या चिटणीस सौ. सुलभाताई सीपोरकर, कायदेशीर सल्लागार सौ. सुखदाताई देशपांडे, सदस्य सौ. आशा भाले, सौ.मनीषा कुलकर्णी, सौ. अनुराधा चंद्रात्रे, सौ. श्रद्धा देशपांडे , श्रीमती विजया देशपांडे, सौ. दिपाली देशपांडे, मुख्याध्यापिका सौ. सुजाता परदेशी यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात सौ. विद्याताई कुलकर्णी यांनी आगामी काळात नाविन्यपूर्ण प्रकल्प, शाळेची गुणवत्ता वाढ इत्यादी उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला. प्रारंभी सहशिक्षिका श्रीमती अंजली पाऊलबुद्धे यांनी शारदा स्तवन तर सहशिक्षिका श्रीमती शुभांगी भुमकर यांनी विद्यार्थिनींसह स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका श्रीमती छाया मुधोळकर यांनी, सूत्रसंचालन सहशिक्षक विलास मोहिते यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक गजानन गिऱ्हे यांनी यांनी मानले.