Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादअंबड येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

अंबड येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

अंबड येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती; प्रतिमा पूजनाने केले अभिवादन

अंबड/प्रतिनिधी/  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, आज शुक्रवारी (दि. २३) अंबड शहरात जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक कुमार रुपवते यांच्या वतीने जुना मोंढा परिसरातील राठी किराणा समोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांकडून आदरांजली

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच्यासह शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

उपस्थित मान्यवर

या सोहळ्याला दिपकसिंह ठाकूर, हनुमान धांडे, दिनेश काकडे, बाळू गावडे, पंडित गावडे, द्वारकादास जाधव, ओमप्रकाश उबाळे, शामप्रसाद लाहोटी, सुनील कसबेकर, दत्ता लांडे, राजधर पवार, संतोष जिगे, गीताराम मते यांच्यासह महेश कुलकर्णी, रावसाहेब वाळवे, संजय खोरे, समद बागवान, केदार कुलकर्णी, अफरोज पठाण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमार रुपवते यांच्यासह शहरातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावून अभिवादन केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments