बाळराजे पवारांच्या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
गेवराई/प्रतिनिधी/ गेवराईची जनता आणि आमचं पवार घराणं, हे नाते विश्वासाने घट्ट झालेले आहे. पिढ्यांनापिढ्या आम्ही एकमेकांशी जोडलोत. गावगाडा सांभाळला की नाही, हे गेवराईकरांना चांगले माहित आहे. यापुढे ही, गेवराई शहरातील जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी दर सोमवारी गेवराई नगर परिषदेच्या सभागृहात येणार आहे. अशी स्पष्ट भूमिका बाळराजे पवार यांनी येथे बोलताना मांडली आहे. सोमवार ता. 14 रोजी बाळराजे पवार यांनी
गेवराई नगर परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेऊन शहरातील नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. ते म्हणाले,नगरपालिका ही संस्था शहरातील समास्यांचे निराकरण करण्याचे माध्यम आहे. त्याठिकाणी कोणी ही राजकीय हस्तक्षेप करणे योग्य नाही. विस वर्षांपूर्वी गावाची परस्थीती काय होती हे जनतेला माहीती होती व बदलेली परिस्थिती जनतेच्या समोर आहे चार वर्षांपासून प्रशासक आहे या काळात जनतेच्या अनेक समास्या रखडलेल्या आहेत त्या समास्याचे निराकारण झाले पाहिजे म्हणून आपण यापुढे प्रत्येक सोमवारी नागरिकांसाठी मी व माझे सर्व मा.नगराध्यक्ष नगरसेवक नगरपालिकेत उपस्थित रहावुन समास्या सोडवणार आसल्याचे ही बाळराजे पवार यांनी सागितले आहे.
स्वच्छ गेवराई सुंदर गेवराईचे जनक लोकप्रिय लोकनेते बाळराजे पवार यांनी गेवराई नगरपालिकेत आढावा बैठक आयोजित करून शहरातील नागरिकांच्या अडचणी समजुन घेत अडचणी मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेला सुचना केली.
यावेळेस शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावुन पंतप्रधान आवास घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पहिला हाप्ता तर काहीना दुसरा हाप्ता मिळालेला नाही. अशा तक्रारी नागरिकांनी करून, आपले गाऱ्हाणे बाळराजे पवार यांच्याकडे माडले. गेली महिन्या पासून शहरातील नाली सफाई झालेली नाही. अनेक ठिकाणी कचरा डेपो साचलेले फोटो दाखवत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पंतप्रधान आवास घरकुल योजनेंतर्गत नवान्ये ऑनलाईन केलेले आहेत त्या संदर्भात अजुन नविन लोकांची यादी जाहीर झालेली नाही. अशा तक्रारारी नागरिकांनी लोकनेते बाळराजे पवार यांच्याकडे नागरीकांनी केल्या आहेत.
यावेळी मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, शिवराज पवार, मा.नगराध्यक्ष सुशील जंवजाळ, ब्रम्हदेव धुरंधरे,मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर,सभापती राहुल खंडागळे,भगवान घुबार्डे,जानमहमंद बागवान, याहीया खाॅन, दादासाहेब गिरी,मधुकर वादे, प्रमोद मोटे, गणेश मोटे,मा.नगरसेवक आप्पासाहेब कानुडे, राम पवार, संजय इंगळे, मुन्ना सेट, कृष्णा काकडे, राजेंद्र आर्दड, धम्मपाल सौदरमल, बद्दोदिन, छगन आप्पा हादगुले, किशोर धोडलकर,अरुण मस्के, भरत गायकवाड, सय्यद आय्युबभाई, सय्यद एजाज, शिनुभाऊ बेद्रे, आदी उपस्थित होते. दरम्यान,
स्वच्छ गेवराई सुंदर गेवराई ब्रिद वाक्य घेऊन लोकनेते बाळराजे दादा पवार यांनी 2006 साली गेवराई नगरपालिकेत बहुमतांने सत्ता स्थापन करून स्वच्छ गेवराई सुंदर गेवराईचे स्वप्न सत्यात आणन्यासाठी गेवराईच्या पवार कुटुंबानी प्रमाणिक प्रयत्न करीत आज गेवराई शहर सुंदर शहर म्हणून नावारुपाला आणले आहे.
2021 पासुन नगरपालिकेवर प्रशासक काळात नागरिकांच्या अनेक अडचणी निर्माण होत आहेत म्हणून नागरिकांच्या मागणी वरून बाळराजे दादा पवार यांनी गेवराई नगरपालिकेत आढावा बैठक घेण्यात आली आहे. यावेळी समाधान मस्के, रामतात्या पवार, शिवाजी काळे, बाबुराव गवारे, इम्रान पठाण, नितीन शेट्टे, पिटु साळवे, प्रकाश उपळकर, लक्ष्मण चव्हाण,शेख शब्बीर, शेख मुददशीर,राजेंद्र तापडीया, शेख बाबा, बंडु रोकडे,रमेश चव्हाण, विशाल पवार, सुदंर काकडे,प्रशांत राख,पप्पु भोसले, मुरली सुतार, रजित खाजेकर, शेख उस्मान, बाळासाहेब गायकवाड, योगेश मोटे, मुन्ना मोटे,गोरख मोटे,राम लिबोरे, प्रकाश बर्डे,बप्पा जाधव, कदीर बागवान, हामीद बागवान, विनायक गिरी,राणा कानाडे, धुरधुरे, शेख राजु, शौकत पठाण, शेख ईर्शाद, कृष्णा पाटोळे आदींसह
वॉर्डातील महिला,नागरिक युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते