बाजारसावंगी येथे राहत्या घरातून अनधिकृत खताचा साठा जप्त, भरारी पथकाची कारवाई, परवाना कायमचा रद्द साठी शिफारस
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील गेल्या अनेक दिवसापासून शेतकरयांना चढ्या दराने खत विक्री करण्याच्या उद्देशाने घरात अवैध पणे साठवलेल्या युरिआ खताचा साठा जप्त करून संबंधित कृषि केंद्राचा परवाना कायम साठी निलंबित करण्याची शिफारस तालुका कृषि विभागाने केली आहे.
खुलताबाद
तालुक्यातील बाजारसावंगी येथील दक्ष शेतकऱ्यांनी खताची च्यढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (ता. २५) रात्री शेषराव कारभारी काटकर बोडखा रस्त्यावरील राहत्या घरातून अनधिकृत पणे युरिया खताचा साठा करून जप्त करुन विक्रेत्यावर कारवाई केली.या कारवाईत रोहित कृषी सेवा केंद्र,कन्नड रोड, बाजारसावंगी,चे मालक शेषराव कारभारी काटकर यांचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
सदरील कारवाई प्रकाश देशमुख विभागीय कृषी
सहसंचालक,छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील,कृषी विकास अधिकारी,जिल्हा परिषद,छत्रपती संभाजीनगर,हरिभाऊ कातोरे,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर काकासाहेब इंगळे, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण),खुलताबाद यांनी केली.या भरारी पथकाच्या तपासणी मध्ये अनधिकृत पद्धतीने घरगुती ठिकाणी खताचा साठा, जादा दराने (३५० ते ४५० रुपये) विक्री, साठा रजिस्टरमध्ये तफावत,प्रत्यक्ष गोदामात युरियाचा साठा असून ही ई-पीओएस वर शून्य दाखवणे व लपवाछपवी करणे या प्रकारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊन त्यांना जादा दराने युरिया घ्यावा लागत होता.कृषी विभागाने कठोर कारवाई करून सदर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.
