बाजार सावंगी येथे व परिसरात गारमिश्रीत पाऊस,सर्वत्र पाणीच पाणी
शेतकऱ्यांसह विट भट्टी चालकांचीही धावपळ!
——————————
खुलताबाद शहरासह तालुक्याभरात झालेल्या पावसामुळे उष्णते पासून काहीसा दिलासा मिळाला,मात्र तालुक्यातील बाजार सावंगी व येसगाव परिसरात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्हाच्या काढणीचा हंगाम सुरू असताना झालेल्या या गारपिटी मुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.खुलताबाद/प्रतिनिधी / खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे व परिसरात अवकाळी गार मिश्रीत पावसाने तारांबळ उडवून दिली. गुरुवारी दि.३ दुपारी तीन साडे तीन च्या दरम्यान अचानक पावसाला सुरूवात झाली तर काही वेळाने हरभऱ्या प्रमाणे गारा मिश्रीत पावसाला सुरुवात झाली.ना ना म्हणता संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.तर दाट ढगाळ वातावरण पावसाची शक्यता बनुन होती.गत तीन चार दिवसा पासून दाट ढगाळ वातावरण अच्छदान टाकूनच होता.तसं वादळ वारा गारपीट सह पावसाचे अंदाज अगोदरच वर्तविण्यात आले होते.
झालेल्या अवकाळी पावसाने गारपीट ने शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली तारांबळ उडाली व गहु मका ज्वारी कांदा बीज वाई विट भट्टी मका भाजी पालाचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी सखोल खोलगट भागात पाणी साचले रस्त्यावर खड्ड्यात पाणी भरले.
गत १०-१५ दिवसा पासून कडक ऊन उकडा तापमान वाढल्याचे चित्र होती परंतु झालेल्या अवकाळी पावसाने थंडावा गारवा निर्माण झाला असुण उकडा तापमान गायब झाला. वारा नसताना मात्र विज महा वितरण कंपनीच्या विद्युत खंडित झाले होते. अद्याप ही दाट ढगाळ वातावरण असुण पावसाची शक्यता बनुन आहे..खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन.कागजीपुरा परिसरात असलेल्या शेकडो विट भट्टी चालकांची देखील धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे विटांची मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने विटभट्टी व्यावसायिक तातडीने उपाययोजना करण्यासाठी धावपळ करताना दिसले.
