भगवान बाबा नगर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण 

0
37
भगवान बाबा नगर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण 
 कृष्णा महाराज बडे यांच्या अमृत वाणीतून भागवत कथाची सुरवात
आष्टी / प्रतिनिधी / परतुर तालुक्यातील आष्टी येथून चार किमी अंतरावर असलेले भगवान बाबा नगर येथे वर्ष दुसरे अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मार्गदर्शक ह भ प आप्पा महाराज चौरे चोंडी संस्थान मार्गदर्शनाखाली चालू करण्यात आला आहे
 दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा भजन सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण नऊ ते दहा गाथा भजन एक ते चार भागवत पुराण पाच ते सहा हरिपाठ रात्री नऊ ते 11 हरी किर्तन होईल नंतर हरी जागर होईल श्रीमद भागवत कथा प्रवक्ते श्री कृष्ण महाराज म.बडे (चोंडी संस्थान )हे करतील व दैनंदिन कीर्तनकार दिनांक 12 4 2025 शनिवार रोजी श्री ह भ प नाना म. महाराज पुरुषोत्तमपुरी कर, रविवार दिनांक 13 4 2025 रोजी ह भ प महंत आईसाहेब राधाताई सानप व सोमवार दिनांक 14 4 2025 रोजी श्री ह भ प अर्जुन महाराज बादाड (तळणी संस्थान) मंगळवार दिनांक 15 4 2025 रोजी माणिक महाराज शास्त्री (गंगाखेड) बुधवारी दिनांक 16 /4/ 2025 श्री. ह. भ. प.केशव म घुले (टाकळीकर) गुरुवारी दिनांक 17/ 4 /2025 श्री. ह.भ. प. पांडुरंग म मुंडे (तांबवा) शुक्रवारी दिनांक 18 /4 /2025 ह.भ.प.रेणुका ताई पाखरे आळंदी देवाची शनिवारी दिनांक 19 /4/ 2025 रोजी श्री.ह.भ.प.महत आप्पासाहेब महाराज चौरे( सद्गुरु चंद्रशेखर बाबा संस्थान चोंडी) यांचे 11 ते 1काल्याचे किर्तन होईल व दुपारी 2 ते  5 महाप्रसादाचा कार्यक्रम होईल