बदनापूर तालूक्यातील मांजरगावात धार्मिक स्थळाबाहेर प्रार्थनेनंतर हल्ला
दोन महिलांसह सहा जण जखमी, तिघे पोलिसांच्या ताब्यात..
जालना प्रतिनीधी / बबनराव वाघ : बदनापूर तालुक्यातील मांजरगावात धार्मिक स्थळातून प्रार्थना करून बाहेर पडलेल्या व्यक्तींवर जमावाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन महिलांसह सहा जण जखमी झाले असून, यामध्ये चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहीती आहे..
प्राथमिक माहितीनुसार, धार्मिक स्थळातून प्रार्थना आटोपून बाहेर येत असलेल्या व्यक्तींवर तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला. घटनेत दोन जखमींना बदनापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारांनंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. काही जण बाहेरून आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पोलिसांना पाहून ते आपल्या मोटरसायकल सोडून पळून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली बदनापूर पोलिसांनी 20 ते 25 मोटर सायकल जप्त केलेली आहे
घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, बदनापूर पोलिस ठाण्यासमोर एका समुदायाची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. परिस्थिती हाताळण्यासाठी जालना पोलीस दलाची तुकडीही मांजरगावात दाखल झाली आहे.