प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषण आंदोलनाला परभणी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा
परभणी  – बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि महिलांच्या न्याय्य मागण्यांसाठी    तुकडोजी महाराजांची समाधी, गुरुकुंज मोझरी, जि. अमरावती येथेसुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी  यांच्या वतीने पूर्ण समर्थन देण्यात आले.  गुरुकुंज मोझरी उपोषण ठिकाणी परभणी काँग्रेस पदाधिकारी  शिष्ट मंडळानी भेट घेऊन परभणी जिल्हाध्यक्ष सुरेशराव वरपुडकर यांचे पत्र देऊन पाठींबा जाहीर केला. यावेळी प्रवक्ते सुहास पंडित, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव, युवक प्रदेश सरचिटणीस वैजनाथ देवकते, युवक काँग्रेस संघटक प्रदीप सोनटक्के, उमेश देशमुख, दिगंवर खरवडे तसेच परभणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे हे उपोषण स्थळी उपस्थित होते .
 काँग्रेस कडून बोलण्यात कि, हा संघर्ष केवळ मागण्यांचा नाही, तर ग्रामीण भागातील दुर्लक्षित वर्गाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.  काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी हिताच्या आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला पुढे आणत आला आहे. आम्ही मागणी करतो की, सरकार या आंदोलनकर्त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देवो आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने पूर्तता करो असे सांगण्यात आले. तसेच  युवक अध्यक्ष अमोल जाधव व प्रवक्ते सुहास पंडित यांनी गुरुकुंज मोझरी उपोषण ठिकाणी जाहीर केले कि,  सरकार ने मागण्या तात्काळ मान्य नाही केल्यास  परभणी येथे ही काँग्रेस तीव्र अन्नत्याग उपोषण करणार अशी घोषणा केली  व शेतकरी-कामगार एकता जिंकू दे! जय जवान, जय किसान, जय संविधान असा नारा ही देण्यात आला