बाबासाहेब थोरात
वैजापूर/प्रतिनिधी/ तालुक्यातील फकीराबादवाडी येथील सेवानिवृत्त तलाठी बाबासाहेब निवृत्ती थोरात वय ६० वर्ष यांचे( दि १४) रविवार रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी वैजापूर तालुक्यात तलाठी (आप्पा) म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वैजापूर येथील दीपक व कृषी सहाय्यक राजेंद्र बाबासाहेब थोरात यांचे ते वडील होत.