बाबासाहेब सराफ यांच्या प्रयत्नांना,उपोषणकर्त्यांच्या मागणीला यश,हक्काच्या जागेवर मिळाला ताबा
आत्ताच एक्सप्रेस
धारूर/प्रतिनिधी/ धारूर तालुक्यातील मौजे रुई धारूर येथील ग्रामपंचायत हद्दीतील राहत्या घराची जागा ३३थाय ३३ हि पी.टी.आर.ला नोंद असलेली जागा प्रत्यक्ष कमी असून सदरील जागेवर संबंधितांनी अतिक्रमण केले होते,अतिक्रमण काढण्यासाठी सय्यद जम्म्रोही शेख करीम,शेषराव नारायण पवार व्यक्तीनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी धारूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. शिवसेना तालुकाप्रमुख बाबासाहेब सराफ यांनी उपोषणकर्ते व प्रशासनामध्ये मध्यस्थी उपोषण स्थगित करण्यात आले.तहसिल प्रशासनाने, ग्रामपंचायत कार्यालयाने लगच मागणी मान्य केली व उपोषणकर्ते्याना त्यांच्या जागेचे मोजमाप करून जागेवर ताबा मिळवून दिला आहे. बाबासाहेब सराफ यांच्या प्रयत्नाला, उपोषणकर्ते्याच्या मागणीला यश आले आहे.अनेक वेळा तक्रारी अर्ज निवेदन करूनही ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाकडून जाणून बुजून दुर्लक्ष करत होते. त्यामुळे संबंधित उपोषणकर्त्ये दि.14 तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले होते. सराफ यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण दि. 15रोजी स्थगित करण्यात आले. संबंधिताकडून सदरील जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण जागेचे मोजमाप करून काढण्यात आलेले आहे.