औरंगजेब कबरीचा वाद शांत होताच,भेट देण्यासाठी पर्यटक तसेच भाविकांची रांगा
-औरंगजेब कबरीच्या मुद्द्यामुळे देशभरात वातावरण तापले होते.
-पर्यटक व भाविकांची खुलताबादकडे पाठ फिरवले होते
– खुलताबाद येथे व्यवसायिकां च्या धंद्यांवर परिणाम झाले होते
खुलताबाद प्रतिनिधी खुलताबाद येथील औरंगजेब कबरीच्या मुद्द्यामुळे देशभर वातावरण चांगलेच  तापले होते भाविक व पर्यटक खबरदारीचा उपाय म्हणून खुलताबाद परिसरातील पर्यटन व धार्मिक स्थळांकडे येण्याचे टाळत होते खुलताबाद शहरासह परिसरातील व्यवसायांवर मोठा परिणाम झाले होते. खुलताबाद शहरात औरंगजेबच्या कबरीवर वाद शांत झाल्याने ईद व बासीईद निमित्त या दोन दिवसात देशभरातील तब्बल   पाच हजार पर्यटक व भाविकांनी औरंगजेब कबरीला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे पर्यटकांची संख्या घटली होती,मात्र वातावरण शांत झाल्याने भाविक व पर्यटनच्या मोठ्या संख्यांनी गर्दी होताना दिसत आहे.. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून,सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. प्रवेशासाठी आधार कार्डची पडताळणी केली जात आहे,तसेच भाविक व पर्यटकांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
ईद व बासी ईदच्या निमित्ताने खुलताबाद शहरात आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला असून,स्थानिक प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. खुलताबाद व परिसरातील व्यावसायिकांनाही याचा मोठा फायदा होत आहे.
गेल्या काही दिवसा पासून देशभरात औरंगजेबच्या कबरीवर विविध कारणांमुळे वादंग निर्माण झाले होते,मात्र सध्या परिस्थिती शांतता झाल्याने पूर्वपदावर येत असून,भाविक व पर्यटकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

