अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी
शासन दरबारी पाठपुरावा करणार – भास्कर आबा दानवे
जालना/प्रतिनिधी/ जालना तालुक्यात मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावा सह शेतात पूराचे पाणी शिरल्याने शेतीसह पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेती व पिक वाहून गेले अशा अतिवृष्टीग्रस्त गावे मौजे धारकल्याण, वडगाव वखारी, नाव्हा, पत्रातांडा इत्यादी ठिकाणी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून शेतकऱ्यांना धीर देऊन सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आपण स्वत पाठपुरावा करणार व शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा जेष्ठ नेते शिवाजी दादा शेजूळ, जिल्हा सरचिटणीस वसंत शिंदे, सुनील पवार, मंडळ अध्यक्ष संजय डोंगरे, भाजपा एस.सी.मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सरकटे, कैलास उबाळे, निवृत्ती लंके, पांडुरंग क्षीरसागर, मुकेश चव्हाण, नागेश अंभोरे, सतीश जारे, किशोर कदम, विनायक राठोड, मुरलीधर जाधव उपस्थित होते.
आज त्यांनी वरील गावांचा दौरा केला असता धारकल्याण येथे सिमेंट नाला बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांची शेती वाहून गेली व अनेक ठिकाणी काढणीस आलेले सोयाबीन व कपासी सह अनेक पिके पुराने वाहून गेली व काही ठिकाणी पिकांमध्ये दोन ते तीन फुट पाणी साचल्याने पिके पाण्यात डुबून गेली. यावेळी तालुक्यातील अनके शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा डोळ्यामधून आश्रू ढाळून त्यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी भास्कर आबा दानवे यांनी शेतकऱ्यांना धीर देऊन वरील आश्वासने दिले.
यावेळी परिसरातील विष्णू ढोबळे, काकासाहेब उगले, राजू उगले, विष्णू दराडे, प्रभाकर खोतकर, विष्णू घोडके, मिसाळ मामा दिनकर दराडे, विनायक उगले, सुभाष भुतेकर, वैभव उगले, कृष्णा यादव, भरत उगले, फकीरबा उगले, विनायक ताठे, सतीश उगले, इत्यादीसह भागातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
