अटकळी ग्रामपंचायत येथे संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
देगलूर / प्रतिनिधी /बिलोली तालुक्यातील अटकळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. १४ एप्रिल १८९१ रोजी महामानव यांचा जन्म झाला समाज परिवर्तनाचे महानायक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञावंत प्रज्ञासुर्य महामानवास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वानी बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले पाहिजे सामाजिक न्याय बंधुता समता या तीन मुल्यांवर सविधान चालत असतो म्हणून या उद्देशाने या भारत देशात व जगातील स्तरांवर मोठी जयंती साजरी करण्यात येते.त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रथमतः महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण शिवाजी पाटिल डोंगरे यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी डि.आर.हबींरे, पत्रकार विलास शेरे,शिवलिंग गायकवाड, बालाजी भालेराव,अफजल शेख,मारोती गायकवाड, नारायण पांचाळ,सलीम शेख, आदी उपस्थित राहुन महामानवास अभिवादन करण्यात आले.